36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमनोरंजनतांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल

तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

लखनौ : वादाच्या भोव-यात सापडलेल्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील तांडव या वेबसीरीजविरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईत या वेबसीरीजविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशात ऍमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह तांडव च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तांडव या वेबसीरीजे निर्माते हिमांशू कृष्ण मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जाफर, लेखक गौरव सोलंकी यांच्यासह वेबसीरीजसंबंधी इतर लोक तसेच ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे त्या अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील ओरिजनल कटेंन्ट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात लखनौ हजरतगंज कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्णबच्या व्हॉट्सऍप चॅटची चौकशी करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या