24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमनोरंजनशाहरूखच्या ‘जवान’चा टीझर आऊट

शाहरूखच्या ‘जवान’चा टीझर आऊट

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड किंग शाहरूख खानने दक्षिणेतील चित्रपटनिर्माता अ‍ॅटलीसोबत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अ‍ॅटली यांच्या ‘जवान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात शाहरूख खानचा लुक एकदम दमदार दिसून येत आहे.

‘जवान’च्या टीझरमधला शाहरूख खानचा लुक पाहून तुमचेही होश उडतील. किंग खानच्या या लुकची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार आहे. किंग खानला याआधी सर्वांनी रोमँटिक हिरोच्या भूमिकेत बघितले आहे. मात्र यावेळी तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

या लुकमध्ये शाहरूखचा संपूर्ण चेहरा, डोके आणि हातावर पट्टी बांधलेली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की शाहरूख जवान बनून बॉक्स ऑफिसवर थैमान घालणार आहे.

‘जवान’ हा ऍक्शनपॅक्ड चित्रपट आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचा ‘पठाण’ही या वर्षी जानेवारीत येणार आहे. म्हणजे २०२३ हे वर्ष किंग खानच्या नावावर असणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

टीझर पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ‘जवान’ हा पॅन इंडियाचा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक आणि नायिका दक्षिणेतील आहेत. ‘जवान’च्या टीझरमधील शाहरूखचा स्वॅग पाहून तुम्हीसुद्धा त्याचे फॅन व्हाल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या