22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमनोरंजन‘विक्रम वेधा’च्या टीझरला प्रेक्षकांची पसंती

‘विक्रम वेधा’च्या टीझरला प्रेक्षकांची पसंती

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऍक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला ‘विक्रम वेधा’चा टीझर लाँच झाल्यानंतर तो दिवसभर ट्विटर आणि यूट्यूबवर ट्रेंड करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘विक्रम वेधा’च्या टीझरचे प्रेक्षकांबरोबरच चित्रपटक्षेत्रातील कलाकार आणि दिग्गज मंडळींनीही कौतुक केले. यामध्ये विकी कौशल, अभिषेक बच्चन, करीना कपूर-खान, राकेश रोशन, सारा अली खान, आलिया भट्ट, झोया अख्तर, सोनाक्षी सिन्हा, वाणी कपूर, कतरिना कैफ, क्रिती सेनॉन, वरुण धवन, परिणीती चोप्रा, सुनिधी चौहान, तोरंज कायवॉन, नंदिश संधू, पुनित डी. मल्होत्रा ​​आणि इतर सेलिब्रिटींचा समावेश आहे.

‘विक्रम वेधा‘ च्या टीझरचे कौतुक करताना विकी कौशलने ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ असे लिहिले. अभिषेक बच्चनने ‘खूप मस्त’ अशी कमेंट केली. अभिनेत्री करीना कपूरने ‘विक्रम वेधा’च्या टीझरची प्रशंसा केली. परिणीती चोप्राने ‘विक्रम वेधा’च्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि सारा अली खानने ‘याची प्रतीक्षा करू शकत नाही, अभिनंदन ’विक्रम वेधा’ असे लिहिले.’ हृतिक रोशनने साकारलेल्या वेधाच्या हटके अवतारापासून ते सैफ अली खानच्या विक्रम या पोलिसाच्या भूमिकेपर्यंत, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम आकर्षक आणि मनोरंजक असल्याचे या टीझरमधून दिसून आले.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या