37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमनोरंजन‘कॉफी विथ करण’ शो बंद होणार

‘कॉफी विथ करण’ शो बंद होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : करण जोहर सूत्रसंचालन करत असलेला ‘कॉफी विथ करण’ हा शो बंद होणार आहे. स्वत: करण जोहरने याबाबत ट्विट करून त्याची घोषणा केली. ‘कॉफी विथ करण’ हा शो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. करणने आपल्या सूत्रसंचालनातून या कार्यक्रमाची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेषत: सेलिब्रिटींचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यात घडणा-या घटना, सध्याच्या मुद्यांवर त्यांचे मत या गोष्टींवर ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाची रूपरेषा आधारलेली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये सेलिब्रिटींनी केलेली वक्तव्ये अनेकवेळा वादग्रस्त ठरून त्याच्या अनेकवेळा बातम्याही व्हायच्या.

शोमधील वक्तव्यांवरून ‘कॉफी विथ करण’ तसेच सूत्रसंचालक करण जोहर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही व्हायची. पण तरीही शोला एक वेगळीच लोकप्रियता मिळाली होती. ‘कॉफी विथ करण’चे आतापर्यंत ६ सीझन प्रदर्शित झाले होते. सातव्या हंगामात कोण असतील, काय चर्चा होईल, याची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच अचानक करणच्या या घोषणेमुळे प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे.

‘कॉफी विथ करण’ शो बंद होत असल्याची घोषणा करताना करण म्हणाला, हॅलो, कॉफी विथ करण हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा भाग राहिला आहे. याचे आता ६ हंगाम झाले आहेत. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याला भारतीय पॉप इंडस्ट्री संस्कृतीत वेगळे स्थान मिळाले. पण अतिशय जड अंत:करणाने मी हा शो बंद होत असल्याची घोषणा करत आहे. ‘कॉफी विथ करण’ आता पुन्हा परतणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या