22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमनोरंजनस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पहिले पोस्टर प्रदर्शित

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पहिले पोस्टर प्रदर्शित

एकमत ऑनलाईन

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती. त्यानिमित्त देशभरात अनेक व्याख्याने आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरम्यान शनिवारी एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचे पहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. दरम्यान तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सिनेमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे. तर वीर सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी महेश मांजरेकर यांनी तेवढ्याच ताकदीचा अभिनेता निवडला आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर शेअर केले आहे. यातून त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. ‘हिंदूत्व धर्म नही, इतिहास हैं’ अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत या सिनेमात रणदीप हुड्डा असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी हे पोस्टर शेअर करताना असे म्हटले आहे की, सावरकरांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या आवृत्त्या असू शकतात पण एक चित्रपटनिर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील यापेक्षा काही फरक असणार नाही. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या