मुंबई : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटानेभारतात सर्वांनाचा वेड लावले. ‘झुकेगा नही…’ हा डायलॉग सगळ्यांच्या तोंडावर राज्य करत होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भारतात भरगच्च कमाई केली. या चित्रपटाचा ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये समावेश आहे. या चित्रपटाने जगभरात भरपूर कमाई केली.
सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता रशियातही ‘पुष्पा’ची जादू पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, पुष्पाने रशियामध्ये चांगली कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने रशियातील बॉक्स ऑफिसवर एक कोटी रुबल्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.