मुंबई, 9 जून : अभिनेत्री जान्हवी कपूरनं धडक या सिनेमातून 2018 मध्ये बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मात्र त्यानंतर तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मागच्या काही काळापासून कारगील युद्धात सामील झालेल्या भारतीय पायलट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिक जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सिनेमात त्यांची भूमिका जान्हवी साकारत आहे. या सिनेमासाठी जान्हवी प्रचंड मेहनत घेतली आहे. या सिनेमाचं प्रदर्शन कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अडकलं. पण आता मात्र हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात जान्हवीचा नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Rear More राखेतून कोळसा तयार करण्यात यश : संशोधनासाठी सरकारकडून पेटंट
जान्हवी कपूर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी ती खूपच वेगळ्या अंदाजात आपल्यासमोर येत आहे. जान्हवीचा गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा माहिती स्वतः जान्हवीनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात बॅकग्राऊंडला जान्हवीचा आवाज असून व्हिडीओमध्ये गुंजन सक्सेना यांच्या लाइफमधले काही हायलाइट्स दाखवण्यात आले आहेत.