23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमनोरंजनमुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्र्यांसमोर झुकतात

मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्र्यांसमोर झुकतात

एकमत ऑनलाईन

मुुंबई : ‘उमंग २०२२’ या मुंबईतील कार्यक्रमाचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हीडीओत शाहरूख खान हा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांसमोर झुकतात असे म्हणत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे.

दरम्यान बॉलिवूडच्या किंग खानने नुकताच ‘उमंग २०२२’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी आयोजित केला जातो, ज्यामध्ये टी.व्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे बरेच सेलिब्रिटी कार्यक्रमात सहभागी होतात आणि एकापेक्षा एक धमाल परफॉर्मन्स देतात.

शाहरूखचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात उमंग २०२२ च्या मंचावर तो आणि कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया दिसत आहेत. हर्ष मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचा उल्लेख करताना म्हणतो की संपूर्ण मुंबई पोलिस त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीत.

यावर शाहरूख खान मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या जबाबदारीविषयी भाष्य करतो. त्यानंतर तो मंचासमोरच बसलेल्या संजय पांडे यांची खिल्ली उडवत म्हणतो की, भले मुंबई पोलिस त्यांचे ऐकते पण ते सुद्धा एका व्यक्तीसमोर ‘येस बॉस’ असे म्हणतात. खरंतर, शाहरूखचा इशारा संजय पांडेंच्या पत्नीच्या दिशेने होता. पण याचे वेगळेच अर्थ काढत व्हीडीओ जोरदार व्हायरल करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या