मुंबई : सलमान खानच्या ‘कभी ईद, कभी दिवाली’ सिनेमाबाबत ‘बदल’ हा शब्द म्हणे पाचवीला पूजला आहे. आता बघा नं जेव्हापासून सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून रोजच सिनेमात जुनं काढून नव्यानं रोज काहीतरी बदल करण्यात येत आहे. कलाकारांच्या बाबतीतही तेच झालं होतं की. आतापर्यंत रोज या सिनेमातील कलाकारांची नवीन लिस्ट समोर येत होती.
मिळालेल्या बातमीनुसार खुलासा होत आहे की, सिनेमाचं टायटल ‘कभी ईद, कभी दिवाली’ हे बदलण्यात आले आहे.
गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सलमानने ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल येण्याची घोषणा केली होती.
आता ‘कभी ईद, कभी दिवाली’ सिनेमाचे टायटल ‘भाईजान’ ठेवले आहे त्यामुळे चाहते भाईजानच्या सिक्वेलचे (सारखे नाव असल्यामुळे)कसे स्वागत करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.