22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमनोरंजन‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

‘मी पुन्हा येईन’चे पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्लॅनेट मराठी निर्मित, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर झळकले असून यात सत्तेसाठी सत्ताधा-यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॉर्ट पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे.

पहिले तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही ५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी दिवटे व विरोधी पक्षनेते मुरकुटे कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे येत्या एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे.

वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताक्षणी आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॉर्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या