26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनन्यूड फोटोशूटचा अंदाज नव्हता : रणवीर सिंग

न्यूड फोटोशूटचा अंदाज नव्हता : रणवीर सिंग

एकमत ऑनलाईन

मुंबई : न्यूड फोटोशूटमुळे बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर रणवीरच्या छायाचित्रांनी धुमाकूळ घातला होता. फोटोशूट प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणी सोमवारी त्याने आपला जबाब नोंदविला आहे.

मुंबई पोलिसांना आपल्या न्यूड फोटोंविषयी जबाब देताना रणवीर सिंग शांत होता. सोमवारी त्याने सकाळी सात ते ९ पर्यंत चेंबूर पोलिस ठाण्यात हजर राहला होता. यावेळी त्याने जबाब नोंदविला.

सूत्रांनी सांगितले, की जेव्हापासून रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवरुन वाद सुरु झाला आहे, तेव्हापासून त्याने आपल्या कायदेविषयक टीमच्या म्हणण्यानुसार गप्प राहिला आहे. आतील गोटातील एकाने सांगितले, फोटोवरुन वाद झाल्यानंतर रणवीरला या विषयी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्याला असंख्य फोन आणि मॅसेज आले होते. मात्र त्याने कायदेविषयक सल्ला म्हणून गप्प राहणेच योग्य पसंत केले.

रणवीरच्या वकीलाने त्याला सल्ला दिला होता की त्याने या प्रकरणी केवळ पोलिसांना आपले स्टेटमेंट द्यावे. बाकी प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलू नये. सूत्रांनी सांगितले की चौकशी दरम्यान रणवीर सिंग खूपच शांत होता. रणवीर जबाबात म्हणाला चित्रीकरणादरम्यान त्याला अंदाज आला नव्हता की फोटोंमुळे इतका वाद होईल.

त्याला टीमकडून मिळालेल्या क्रिएटिव्ह गाईडलाईन्स फॉलो करत केवळ एक अभिनेता म्हणून आपले काम केले आहे. रणवीरला पुढेही समन्स बजावले जाईल की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या