23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमनोरंजन‘आणि काय हवं-३’मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ

‘आणि काय हवं-३’मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरीसुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामे, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहका-यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरीसुद्धा येतात. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा-बायकोच्या हेल्दी रिलेशनशिपसाठी हे कधी नुकसान करणारेही ठरू शकते. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपले नाते अधिकच दृढ करू शकतो, हे एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित, वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं’च्या तिस-या सीझनमध्ये दाखवण्यात आले आहे.

‘आणि काय हवं’च्या पहिल्या आणि दुस-या सीझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरांत पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे आता ‘आणि काय हवं’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ऑफिसच्या कामानंतर एकत्र वेळ घालवण्याबाबत जुई म्हणजेच प्रिया बापट म्हणते, ‘वर्किंग कपल्सनी ऑफिसच्या कामानंतर एकमेकांसाठी काही वेळ काढलाच पाहिजे, जेणेकरून त्यांचे नाते बहरेल, काही वेळ एकत्र सोबत घालवल्याने एकमेकांमधील बॉण्डिंग अधिक घट्ट होते. काही गोष्टींची, विचारांची देवाणघेवाण केल्यानेनात्यातील जिवंतपणा कायम राहतो आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे एकमेकांमधील विश्वास आणि प्रेम वाढते. नाते कधी कंटाळवाणे होत नाही.

चोरट्यांनी उडवली मानवतकरांची झोप, गल्लोगल्ली नागरिकांचे जागरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या