मुंबई : महाराष्ट्राच्या लोकसंगीतातले मोठे घराणे म्हणजे शिंदे घराणे. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे आणि त्यांची पुढची पिढी आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्यापर्यंत सा-यांनीच आपले नाव केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत न ठेवता जगात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे.
आदर्शनं एक पाऊल पुढे जात सिनेसंगीतावरही आपला ठसा उमटवत तिथेही आपले स्थान मजबूत केले आहे. नुकतेच शिदे कुटुंबाचे नाव जगाच्या पटलावर नवा रेकॉर्ड करून गेले आहे. शिंदे घराण्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे. यासंदर्भातील एक पोस्ट उत्कर्ष शिंदे यांनी केली आहे.
उत्कर्ष शिंदे यांनी केलेल्या पोस्टनुसार २३ जून, २०२२ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदे कुटुंबाला ‘मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट इन फॅमिली’ हा सन्मान प्राप्त झाला आहे.