घोडखिंडीतला लढ्याची शौर्याची पावन गाथा, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पवित्र रक्ताने जी भूमी पावन झाली, त्याच लढ्याची शौर्याची गाथा सांगणारा ‘जंगजौहर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि त्यांच्या मुघलांविरोधातील लढाईत ढालीसारखे त्यांच्यावर येणारे सारे वार झेलणारे त्यांचे विश्वासू सरदार आणि मावळे यांचा पराक्रम शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यातीलच एक विश्वासू सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. ज्यांनी छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा त्यांच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.
‘आलमंड्स क्रिएशन्स’चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी ‘जंगजौहर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची ‘जंगजौहर’मधून उलगडणारी बलिदानगाथा प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक असेल. यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांमधील ‘फर्जंद’ आणि फस्तेशिकस्त ला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या तिसर्या पराक्रम गाथेबद्दलही शिवप्रेमी आणि रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
Read More टीसीएस देणार देशातील ४० हजार जणांना रोजगार