24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमनोरंजन‘ती माझी प्रेमकथा’ ३० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

‘ती माझी प्रेमकथा’ ३० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘फिल्मी टाईम प्रोडक्शन’ सह आणि ‘कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट’ सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुकव्वर निर्मित ‘ती माझी प्रेमकथा’ या प्रेममय चित्रपटातून येत्या ३० सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे.

अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या को-या जोडीने ‘ती माझी प्रेमकथा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. पद्मिनी आणि तुषारची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवोदित कलाकारांनी या चित्रपटात प्रेमाचे काय रंग उधळलेत हे पाहणे या चित्रपटात खरेच रंजक ठरेल. विशेष म्हणजे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये ही झळकणार आहेत, तर भोंगा फेम कपिल कांबळे या चित्रपटात तुषारच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदा-या उत्तम पेलवल्या आहेत. तर या चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी कपिल जोंधळे यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा राजवीर गांगजी याने पेलवली.

एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, ते प्रेम अविश्वासाला थारा देत नाही हे ‘तू माझी प्रेमकथा’ या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या