मुंबई : बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असणारी जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना कुणाची नजर लागली की काय, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्याला कारणही तसेच आहे. या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या टायगर आणि दिशाचे अखेर ब्रेकअप झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी ब्रेकअप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
टायगर आणि दिशा आता एकमेकांसोबत काम करणार नाहीत असेही सांगितले जात आहे. चाहत्यांना मात्र त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या अशा प्रकारच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे कपल म्हणून टायगर आणि दिशाकडे पाहिले जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ते आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असेही बोलले जात होते.
त्यामुळे ब्रेकअपच्या बातम्यांनंतर त्या गोष्टीवर पडदा पडला आहे. गेल्या वर्षापासून टायगर आणि दिशा यांच्यातील वाद समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केल्याचे बोलले जात आहे.