28.4 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमनोरंजनटायगर श्रॉफला दुखापत

टायगर श्रॉफला दुखापत

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अ‍ॅक्शन आणि स्टंट सिनेमांमुळे इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहे. टायगर त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये भरपूर अ‍ॅक्शन मसाला ठेवतो, ज्यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागते. नुकतंच टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील एक अ‍ॅक्शन स्टंट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफसोबत अपघात झाला आहे.

अ‍ॅक्शन स्टंट करताना टायगरसोबत अपघात झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझा पाय मोडला.

मला वाटले की मी ते करेन आणि मी अधिक जोर लावला. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की टायगर एका माणसासोबत जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. तो माणूस स्वत:चा बचाव करण्यासाठी समोर वॉश बेसिन आणतो आणि टायगर त्याला तोडतो. मात्र यामुळे टायगरच्या पायालाही दुखापत होते. टायगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेचिंता व्यक्त करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या