24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन गर्भवती महिलांना ‘बेबो’कडून टिप्स

गर्भवती महिलांना ‘बेबो’कडून टिप्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान लवकरच दुसºयांदा आई होणार आहे. करिना सात महिन्यांची गर्भवती आहे. परंतु, तिने अद्याप सगळ्या कामांमधून ब्रेक घेतलेला नाही. पहिल्या प्रेग्नन्सीप्रमाणे, या वेळीही ती स्वत:ला कामात व्यस्त ठेवून, सगळ्याचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर ती सतत आपल्या अ­ॅक्टिव्हिटीजची छायाचित्रे पोस्ट करत असते. एका मुलाखतीत करिनाने ज्या महिला गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कुचराई करतात, त्यांना खास संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरही काम करत राहिल्याने स्त्री आणि तिचे नवजात बालक, दोघांनाही फायदा होतो, असे करिना म्हणाली. गर्भारपणात काम करत राहिल्याने महिला पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय बनतात आणि मुलांचे आरोग्य इतर मुलांच्या तुलनेत चांगले राहते, असे करिना म्हणाली.

खरे तर, गर्भधारणेदरम्यान, शरीरात होणारे बदल महिलांना अस्वस्थ करतात. पण अशा महिलांसाठी करिना कपूर-खानने एक उदाहरण ठेवले आहे. जर, आपणही करिनासारखे काम करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवून आपण हा कालावधी आनंदात व्यतीत करू शकता. गर्भवती महिलांनी जास्त वेळ उपाशी राहू नये. त्याऐवजी, दिवसभर काही वेळाच्या अंतराने सतत काहीतरी खात राहिले पाहिजे. जेणेकरून आई आणि मुलाला योग्य पोषण मिळते. अशा वेळी गर्भवती महिलांनी फळे, रस, नारळपाणी इत्यादींचे सेवन करावे.

गर्भधारणेदरम्यान शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी डॉक्टर महिलांना आयर्नयुक्त औषधे देतात. परंतु, फक्त या औषधांवर अवलंबून राहू नका. लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळिंब, केळी, हिरव्या भाज्या, मोड आलेले धान्य, हरभरा इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करा. मोड आलेली कडधान्ये खाणे देखील फायदेशीर आहे. याशिवाय कॅल्शियमसाठी दूध, दही, चीज आणि दुधापासून बनवलेले इतर पदार्थ देखील खा.

चहा-कॉफीचे सेवन टाळावे
जर आपल्याला चहा-कॉफीची आवड असेल तर, या काळात आपण दिवसातून एक किंवा दोन वेळा ही पेये पिऊ शकता. चहा-कॉफीच्या अधिक सेवनाने गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

आता चिनी टेलिकॉम कंपन्या केंद्राच्या रडारवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या