21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमनोरंजन‘समांतर-२’ चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘समांतर-२’ चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

एकमत ऑनलाईन

मुंबई : असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतंच… मग कितीही नशीब नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तरीही. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सिरीज ‘समांतर’ आपला सिझन-२ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे.

यात पुन्हा एकदा अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’ सिझन-२ विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसºयाचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

सिझन-२ मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकित आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरू होतो. या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाही या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.

सलग दुस-यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या