मुंबई : काजोल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ती सध्या ‘त्रिभंग’ या सिनेमाचे काम करते आहे. या सिनेमाचा ट्रेलर तिने लॉन्च केला आणि आपल्या फॅन्सला त्याबद्दल माहिती दिली. ‘त्रिभंग’ या सिनेमाचे डायरेक्ट रेणुका शहाणे करते आहे, तर काजल त्यामध्ये लीड रोल करताना दिसणार आहे. ‘त्रिभंग’ मध्ये मिथिला पालकर, तन्वी आझमी आणि आणि कुणाल रॉय कपूर हेदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. १५ जानेवारीला हा सिनेमा नेटफिक्सवर रिलीज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काजोलचा हा पहिलाच सिनेमा रिलीज होणार आहे. मुख्य म्हणजे ती या सिनेमात ओडिसी डान्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
काजोल, मिथिला पालकर आणि तन्वी आझमी या तिघींनी या सिनेमाच्या शुंिटग दरम्यान रेणुका शहाणेबरोबर खूपच धम्माल मस्ती केली. तिघींच्या वेगवेगळ्या कथा आणि भावविश्वाचे अंतरंग या सिनेमात उलगडताना दिसणार आहे. काजोलने अशाप्रकारचा रोल यापूर्वी कधीच केलेला नव्हता. त्रिभंगचे प्रोडक्शन अजय देवगणने केलेले असल्यामुळे काजोलला या सिनेमाकडून विशेष अपेक्षा आहेत.