24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमनोरंजन“झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं...

“झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं -अमिताभ बच्चन

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत अनेक माहिती समोर आल्यानंतर आता अनेक कलाकार बॉलिवूडवर लागलेले डाग मिटविण्यासाठी समोर येत आहेत. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी लोकसभेत नाव न घेता भाजपचे रवी किशन यांना टोला लगावला. त्यानंतर जय बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्यामुळे आता पत्नीच्या समर्थनार्थ अमिताभ बच्चन समोर आले आहेत. त्यांनी ट्रोलर्सना प्रत्युत्तर देणारं ट्विट केलं आहे.

त्यांनी एक शेर आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. सध्या जया बच्चन यांना बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेतय. त्या ट्रोलर्सना बिग बींनी प्रत्युत्तर दिलं आहे.महानायक अमिताभ बच्चन यांच्या सर्व चारही बंगल्यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व बंगल्यावर असणाऱ्या सिक्योरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. संसदेत समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. परिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळते आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा जुहू स्थित बंगल्याबाहेर देखील मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटबरोबरच जया बच्चन यांच्या विरोधी पक्षात असलेल्या हेमा मालिनी यादेखील जया बच्चन यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरल्या आहेत. भाजप नेत्या हेमा मालिनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, मला लोकांना सांगायचे आहे की बॉलिवूड एक सुंदर जागा, रचनात्मक जग, एक कला आणि संस्कृती उद्योग आहे. जेव्हा लोक बॉलिवूडबद्दल चुकीचं मत व्यक्त करतात तेव्हा मला याचं वाईट वाटतं. आता हा ड्रग्जचा आरोप…हे कुठे होत नाही? मात्र जेव्हा कोणता डाग लागतो तेव्हा तो धुतला जातो. बॉलिवूडवर लागलेल्या डागही निघून जाईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या