30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन धर्म बदलण्यासाठी त्रास दिला : कमालरुख खान

धर्म बदलण्यासाठी त्रास दिला : कमालरुख खान

एकमत ऑनलाईन

मुंबई : संगीतकार जोडी साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान याचे निधन झाले. या वेदनेतून त्यांची पत्नी कमालरूख खान अद्याप बाहेर येऊ शकली नाही. त्यांनी यादरम्यान सोशल मीडिया अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट लिहिली. यात त्यांनी पतीच्या कुटुंबियांनी धर्म बदलण्यासाठी कशाप्रकारे धमकावले किंवा भिती दाखवली हे सांगितले आहे.

कमालरूख ही जन्माने पारसी आहे. इन्स्टाग्राम हँडलवर एक अ­ँटी कन्वर्जन लॉवर पोस्ट वाजिद खानच्या पत्नीने लिहिली आहे. तिला इंटरकास्ट मॅरेजमुळे काय वेदना, त्रास सहन करावा लागला याचा उल्लेख तिने यात केला आहे. आपल्या पोस्टमध्ये कमालरूखने लिहिले आहे की, ती आणि वाजिद कॉलेजमध्ये एकत्र होते. दोघे १० वर्षे लग्नाआधी सोबत होते.

कमालरूख पारसी तर वाजिद मुस्लिम होता. त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार लग्न केल होते. कमालरूखने लिहिले की, एका साधारण पारसी डेमोक्रॅटीक सिस्टीममध्ये माझी वाढ झाला. विचारांचे स्वातंत्र आणि हेल्दी डिबेट होत होते. शिक्षणाला प्रोत्साहन दिले जायचे. पण लग्नानंतर हेच स्वातंत्र, शिक्षण आणि डेमोक्रॅटीक मूल्य माझ्या पतीच्या परिवारासाठी सर्वात मोठी समस्या बनले.

लातूर जिल्ह्यात ६४ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या