मुंबई : जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकारांना कार्सची क्रेझ आहे. ते नेहमीच त्यांच्या आलिशान गाड्यांमधून फिरताना दिसतात. त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण ट्ंिवकल खन्ना हिने नुकताच रिक्षातून प्रवास करण्याचा आनंद उपभोगला.
अक्षय कुमारची बायको ट्ंिवकल ही नेहमीच तिच्या वागण्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. आता नुकताच तिने तिच्या लेकीबरोबर रिक्षातून प्रवास केला. या वेळचा तिचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हीडीओत ट्ंिवकल खन्ना तिची लेक निताराबरोबर रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी निताराच्या हातात त्यांनी केलेल्या खरेदीची पिशवी आहे. ट्विंकल रिक्षात बसून त्या रिक्षावाल्याला ‘चलो भैय्या’ असे म्हणत निघण्यास सांगते. यावेळी दोघी मायलेकी हसत-खेळत, गप्पा-गोष्टी करत रिक्षातून प्रवास करताना दिसल्या.