27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनट्विंकल आता यूके मध्येच राहणार : अक्षय कुमार

ट्विंकल आता यूके मध्येच राहणार : अक्षय कुमार

एकमत ऑनलाईन

मुंबई : ट्विंकल खन्ना लंडनला निघाली आणि तिथेच ती आता राहणार अशा संदर्भात अक्षय कुमार बोलून बसला अन् नको त्या बातम्यांना ऊत आला. आता ट्विंकल लंडनमध्ये राहणार आहे, तिला सोडायला स्वतः अक्षय कुमार वेळ काढून गेलाय हे सगळं खरं आहे. पण त्यामागे एक मोठं कारण आहे.

अक्षय कुमार ९ सप्टेंबरला आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. याआधीच संपूर्ण कुटुंबासोबत तो लंडनला रवाना झाला आहे. बोललं जात आहे की, अक्षय पूर्ण एक महिना लंडनमध्ये राहणार आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. आता त्याचे सिनेमेही बॅक टू बॅक फ्लॉप जात आहेत आणि त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. बातमी आहे की तो काही दिवस सिनेमांपासून दूर राहणार आहे. आता या सगळ्या चर्चा सुरु असताना अक्षय लंडनला जाण्याचं एक खास कारण समोर आलं आहे. यामागे कारण आहे त्याची पत्नी ट्विंकल खन्ना

माहितीनुसार, लेखिका म्हणून आपली नवी कारर्किर्द एन्जॉय करणारी ट्विंकल खन्ना आता आयुष्यात एक नवीन इनिंग सुरु करतेय. ती आता फिक्शन रायटिंग मध्ये मास्टर डिग्री संपादित करण्यास सज्ज झालीय. त्यासाठी तिनं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये प्रवेशही घेतला आहे.

अक्षय कुमार संपूर्ण कुटुंबासोबत म्हणजे पत्नी ट्विंकल,मुलगा आरव आणि मुलगी नितारा सोबत लंडनला रवाना झाला आहे. अक्षय याबाबतीत बोलताना म्हणाला आहे की, लोक आपल्या मुलांना कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जातात पण मी माझ्या पत्नीला लंडन युनिव्हर्सिटीत सोडायला चाललो आहे. कारण ती फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर करत आहे. आणि त्यासाठी ती आता लंडनमध्येच आमच्यापासून दूर राहणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या