23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजनउर्फी जावेद ठरली गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्री

उर्फी जावेद ठरली गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : आशियात गुगलवर सर्वाधित सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर झाली आणि या यादीत उर्फी जावेदने आपले स्थान निर्माण केले आहे. ‘मोस्ट सर्च्ड एशियन्स ऑफ गूगल २०२२’ मध्ये उर्फीने ५७ वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे तिने केवळ गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या आशिया खंडातील लोकांच्या यादीत स्थानच मिळवले नाही तर तिने कंगना रनोट आणि कियारा अडवाणी सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. चीनच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ ची आशिया खंडातील सर्वाधिक सर्च झालेल्या लोकांची ही यादी तयार केली आहे.

‘बिग बॉस १५’ची विजेती तेजस्वी प्रकाशही उर्फीच्या मागे पडली आहे. त्याचबरोबर अनन्या पांडेचे नाव ९८ व्या क्रमांकावर आले आहे. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत सिंग, क्रिती सेनॉन, दिशा पटानीसह अनेक अभिनेत्रींना उर्फीने मागेल टाकले आहे. गुगलवर टॉप १० सर्च झालेल्या आशियाई लोकांमध्ये बीटीएस वी, जंगकूक, सिद्धू मूसेवाला, जिमिन, लता मंगेशकर, लीसा, कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या