21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनउर्फीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

उर्फीची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद स्टाइल, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशनमुळे ती नेहमीच नेटक-यांना थक्क करत असते. उर्फीला तर आता फॅशन आयकॉन म्हणायला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी समोर येत असते. अशातच उर्फी जावेदची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली आहे.

उर्फीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उर्फीची तब्येत खराब होती.

गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्यांचा त्रास होत होता. आज तिला १०३ ते १०४ डीग्री ताप आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. या बातमीमुळे उर्फीचे चाहतेचिंतेत पडले आहे. ती बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

प्रत्येक लुक आणि पोशाखात आत्मविश्वासानं वावरणा-या उर्फीला अनेकवेळा तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फीला ट्रोल केलं तरी ती त्या गोष्टीला न जुमानता पुढच्या वेळी आणखी अतरंगी लुकमध्ये येऊन चाहत्यांना धक्का देते. आपल्या बोल्डनेसमुळे सगळ्यांनाच अवाक् करणारी उर्फी जावेद सतत चर्चेत असते. आपल्या हटके, बोल्ड, अतरंगी फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या