22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमनोरंजनखूप दयाळू ...! ; सोनमच्या पतीसाठी हटके शुभेच्छा

खूप दयाळू …! ; सोनमच्या पतीसाठी हटके शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

मुंबई : माझा पती, तुम्ही नि:स्वार्थपणे समर्पित आणि खूप दयाळू आहात.. अशा आशयाची पोस्ट शेअर करत अभिनेत्री सोनम कपूरने पती आनंद आहुजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम आणि आनंद आहुजा लवकरच आई-वडील होणार आहेत. हे दोघे त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. शुक्रवारी आनंदचा वाढदिवस होता.

त्या निमित्ताने सोनमने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत पती आनंद आहुजावर प्रेमाचा वर्षाव केला.
सोनमने आनंद आहुजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत, माझा पती, तुम्ही नि:स्वार्थपणे समर्पित आणि खूप दयाळू आहात.

प्रेम मिळवण्यासाठी मी आयुष्यात काहीतरी खूप चांगलं काम केलं असेल. तुझी तुलना कधी कोणासोबत होऊ शकत नाही आणि भविष्यातही होणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू सगळ्यात चांगला वडील होणार. ‘आय लव्ह यू’ असे कॅप्शन तिने दिले आहे. सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या