मुंबई : गेले दोन दिवस सर्वत्र होळी आणि धुळवडीमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. काल जवळपास सर्व सेलिब्रिटींनी रंग खेळले. त्याचबरोबर त्यांची मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांच्याबरोबर वेळ घालवला. त्या सर्वांनी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यात विकी कौशलचाही समावेश आहे. आता त्याचा एक व्हीडीओ खूप चर्चेत आला आहे.
विकी कौशल आणि पत्नी कतरिना कैफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर होळीचा सण उत्साहात साजरा केला. यादरम्यानचे काही फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असतानाच दुसरीकडे विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी त्यांचा आणि विकीचा भांगडा करतानाचा एक व्हीडीओ शेअर केला आहे.
विकी कौशल पंजाबी आहे. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते निवृत्त झाले आहेत. होळीच्या निमित्ताने विकी कौशल आणि त्याचे वडील श्याम कौशल यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विकी कौशल त्याच्या वडिलांबरोबर भांगडा करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडीओ कतरिना कैफने शूट केला आहे. तर त्यांचा हा हटके अंदाज पाहून कतरिनालाही हसू आवरेनासं झालं आहे.