Saturday, September 23, 2023

विद्या बालनचा शकुंतलादेवी अमॅझोन प्राईम वर रिलीज होणार

मुंबई – जगविख्यात गणितज्ज्ञ शकुंतलादेवी यांच्या जीवनावर आधारित शकुंतलादेवी हा चित्रपट पुढच्या महिन्यात अमॅझोन प्राईम प्लटफॉर्मच्या माध्यमातून जगभरात प्रदर्शित होणार आहे. सोनी पिक्सर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन्सने या चित्रपटाचीन निर्मिती केली असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने या चित्रपटात शकुंतलादेवींची प्रमुख भूमिका केली आहे.

शकुंतलादेवी या भारतातील गणितज्ज्ञ होत्या. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या शकुंतलादेवींनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच गणितातील आकडमोड प्रचंड वेगाने करता येत असे. त्यांचे वडिल सर्कसमध्ये काम करायचे त्यांनी शकुंतलादेवींचे कौशल्य ओळखले आणि रस्त्यांवर त्यांच्या गणित कौशल्याचे सादरीकरण करून पैसे मिळवायला सुरुवात केली. शकुंतलादेवींनी कोणतंही लौकिक शिक्षण घेतलेलं नसतानताही त्या एकाद्या अंकाचा २३ वा घात असलेली संख्या सेकंदांत सांगायच्या.

Read More  धार्मिक संस्थांचे सोने भारताला तारेल ?

लंडन, न्यूयॉर्क तसंच युरोपातल्या इतर देशांत त्यांनी आपलं कौशल्य दाखवून शास्रज्ञ, गणितज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांनाही चकित करून टाकलं होतं. मानवी कॉम्प्युटर अशी त्यांची ख्याती होती. अमेरिकेतील मानसोपचारतज्ज्ञाने त्यांच्या चाचण्या केल्या तरीही त्याला त्यांच्या बुद्धिमत्तेचे कारण लक्षात आले नाहीत. जगाला कोड्यात टाकणारी बुद्धिमत्ता असलेल्या शकुंतलादेवींच्या आयुष्यावरील हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना पुढच्या महिन्यात मिळणार आहे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या