मुंबई : प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा आता ईडीच्या जाळ्यात अडकला आहे. त्याची ईडीकडून बारा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या प्रकरणावर विजयने भावूक होत प्रतिक्रिया दिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान या सगळ्यात मात्र विजयला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्याने सांगितले आहे. ‘लायगर’मध्ये त्याच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे होती. ‘लायगर’कडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.
आता ईडीने ‘लायगर’शी संबंधित एकेका व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. थोड्याच दिवसांनी अनन्या पांडेला देखील नोटीस पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील सुशांतसिंह प्रकरणात अनन्या पांडेला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ‘लायगर’चे निर्माता चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांची देखील चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन करन्सी पॉलिसी उल्लंघन (फेमा) केल्याप्रकरणी चित्रपटाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे.