26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमनोरंजनविकास सिंग : सुशांतवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला ड्रग्स दिले जायचे

विकास सिंग : सुशांतवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला ड्रग्स दिले जायचे

एकमत ऑनलाईन

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला रोज एक नवं वळण येते आहे. सुशांतच्या वडिलांचे वकील यांनी दावा केला आहे की, ‘सुशांतवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला ड्रग्स दिले असतील. सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी बुधवारी सांगितले की, सुशांतच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने त्याच्या नकळत त्याला ड्रग्स दिले असावेत.

ज्येष्ठ वकिलाच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याच्या कुटुंबाने सुरुवातीला असा विचार केला होता की डॉक्टरांच्या निर्देशानुसार सुशांतला दिली जाणारी औषधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले गेली. रिपोर्टनुसार सिंग म्हणाले, मात्र आता असे कळते. की त्याला ड्रग्स देण्यात आले.

सुशांत सिंग राजपूत तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती व तिचे संबंधित सर्वांचे फोन डिटेल्स तपास पथकाने मिळविल्यांतर आर्या याचे नावही आता चर्चेत आले आहे. सीबीआय, ईडी आणि आता NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंग आणि रिया यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.

लातूरहून धावतायेत १०६ एसटी बसेस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या