बंगळुरू : विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा बंगळुरूमध्ये चाहत्यांच्या गर्दीत अडकले. हॉटेलच्या मेन दरवाजापासून १० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या कारपर्यंत पोहोचण्यासाठीही या जोडप्याला मोठी कसरत करावी लागली. गर्दीपासून बचाव करत कोहलीने पत्नी अनुष्काला कारपर्यंत नेले.
दरम्यान, एका चाहत्याने अनुष्कासोबत जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर कोहली संतापल्याचे पाहायला मिळाले.
खरंतर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्ज इलेव्हनसोबत चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे होणार आहे. विराट केवळ सामन्यामुळे बंगळुरूमध्ये आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही आहे. दोघे बंगळुरू येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेव्हा लोकांना समजले की विराट-अनुष्का हॉटेलमध्ये आले आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी हॉटेलबाहेर एकच गर्दी केली.