19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमनोरंजनविवेक अग्निहोत्रींचा ‘द वॅक्सिन वॉर’ येतोय

विवेक अग्निहोत्रींचा ‘द वॅक्सिन वॉर’ येतोय

एकमत ऑनलाईन

मुंबई : अलीकडेच विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे संकेत देऊन सर्वांचे लक्ष वेधले होते, दर्शकांची उत्सुकता शिगेला असतानाच, आता चित्रपटनिर्मात्यांनी अखेर त्यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक ‘द वॅक्सिन वॉर’ जाहीर केले आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा ११ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी जाहीर करण्यात आले. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेचाही उल्लेख आहे. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

याबाबत बोलताना विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, ‘‘लॉकडाऊन दरम्यान जेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ पुढे ढकलण्यात आला, तेव्हा मी यावर अभ्यास सुरू केला. मग आम्ही आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी आपली स्वदेशी लस तयार केली. त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती आणि संशोधन करताना आम्हाला समजले की, हे शास्त्रज्ञ भारतासाठी केवळ परदेशी एजन्सीच नव्हे तर आपल्याच लोकांशी कसे लढले.

आपण सर्वांत वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस तयार करून महासत्ता देशांवरही विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावीशी वाटली. एका बायो-वॉरबद्दल भारतातील हा पहिला विज्ञान चित्रपट असेल,’’ असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या