कोलकाता : कोलकाता सियालदह न्यायालयाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती.
२०१८ मध्ये ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील ६ काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून आरोपपत्र सादर केले.