25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमनोरंजन‘द्रौपदी राष्ट्रपती तर पांडव कोण?’; राम गोपाल वर्मा यांचे बेताल वक्तव्य

‘द्रौपदी राष्ट्रपती तर पांडव कोण?’; राम गोपाल वर्मा यांचे बेताल वक्तव्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड फिल्ममेकर राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रिटी आहेत. आता त्यांनी केलेले एक वक्तव्य भलतेच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका केली आहे. त्या टीकेनंतर भाजपने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. एनडीएच्या वतीने मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदासाठी अर्ज केला आहे. त्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

रामगोपाल वर्मा यांच्या त्या ट्विटनंतर भाजपने हैदराबाद येथील एका पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्ही लवकरच वर्मा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमधून एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, जर द्रौपदी राष्ट्रपती आहे तर मग पांडव कोण आहेत? याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौरव कोण आहेत, या ट्विटनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.

रेड्डी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्मा यांच्या त्या वक्तव्यामुळे एससी आणि एसटी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या