33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home मनोरंजन ट्वीटमुळे जुही चावला का होत आहे ट्रोल?

ट्वीटमुळे जुही चावला का होत आहे ट्रोल?

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मित्रपरिवार, नातेवाइक, इतर कलाकार आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ते सर्व बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहेत. त्यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अभिनेत्री जुही चावलानेदेखील  बच्चन कुटुंबाबाबत ट्वीट केलं आहे. मात्र यानंतर ती ट्रोल होऊ लागली.

बच्चन कुटुंबाबाबत ट्वीट करताना अभिनेत्री जुही चावलाने एक चूक केली आणि ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ती ट्रोल होऊ लागलीत. जुहीने आराध्याच्याऐवजी आयुर्वेदा असं लिहिलं होतं. जुही चावलाने ट्वीट केलं, “अमितजी, अभिषेक आणि आयुर्वेदा लवकरच बरे होतील” ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं आराध्याचं नाव जुहीने आयुर्वेदा असं लिहिलं. एका ट्विटर युझरने याबाबत विचारलं त्यानंतर जुहीने हे ट्वीट डिलीट केलं आणि पुन्हा दुसरं ट्वीट केलं. ज्यामध्ये तिने आराध्या असं लिहिलं.

Read More  उस्मानाबाद :जिल्ह्यात रविवारी निघाले २४ कोरोनाबाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या