18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमनोरंजनधोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपरकिंग्जमार्फत धोनीचा खेळ सुरू आहे. क्रिकेटशिवाय धोनी जाहिरातींमध्ये देखील खूप वेळा दिसला आहे. हल्लीच धोनी २०२१ च्या जाहिरातीत झळकला त्यामध्ये त्याचा एकदम हटके अंदाज दिसला. धोनीच्या अनेक चाहत्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याबाबत सांगितले आहे. मात्र धोनी याबाबत काय विचार करतो याचा खुलासा नुकताच त्याने केला आहे.

धोनीचा बायोपिक बनवण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतने त्याची भूमिका साकारली होती. धोनीने त्याच्या बायोपिकमध्ये स्वत:चे पात्र साकारावे, अशी मागणी त्यावेळी अनेक लोक करत होते, पण क्रिकेटपटूला स्वत: ला दीर्घ काळासाठी कॅमे-यासमोर राहणे खूप कठीण होते. धोनी म्हणतो की तो निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याचा विचारही करत नाही, कारण त्याला वाटते की अभिनय करणे सोपे नाही.

धोनी म्हणाला की, तुम्हाला माहीत आहे की बॉलिवूड खरोखर माझ्यासाठी नाही. जोपर्यंत जाहिरातींचा संबंध आहे, मी ते करण्यात खूप आनंदी आहे. जेव्हा चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की हा एक अतिशय कठीण व्यवसाय आहे आणि हे हाताळणे खूप कठीण आहे. मी ते चित्रपट स्टार्सवर सोपवतो, कारण ते खरोखरच चांगले आहेत. मी क्रिकेटशी जोडला गेलेलो आहे. मी फक्त जाहिरातींद्वारे अभिनयाच्या जवळ येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही.
खूप कमी लोकांना माहीत आहे की धोनीने बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ केला होता. पण त्याचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘हुक या क्रूक’ होता. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रेयस तळपदेसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या