मुंबई : ‘आत्महत्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.. त्यामुळे धीर धरा म्हणजे तुम्ही नक्की मराल..’ असे म्हणत उर्फीने एक ट्विट केल्याने ती डिप्रेशनमध्ये असल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असणारी उर्फी गेले काही दिवस एका वेगळ्याच वादात सापडली आहे. तिच्या फॅॅशन आणि तोकड्या कपड्यांवर राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने हा वाद चांगलाच पेटला. या वादाला आता १५ दिवस उलटून गेले तरी उर्फी काही गप्प बसायचं नाव घेत नाही.
आता उर्फीने पुन्हा एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने आत्महत्येचा उल्लेख केला आहे. यावरून उर्फी डिप्रेशनमध्ये आहे की काय? अशाही चर्चा सुरू झाल्या आहे. हे ट्विट तिने नेमके कुणासाठी लिहिले आहे, हे माहीत नाही. पण नेटक-यांनी मात्र यावरून तिची खिल्ली उडवली आहे. असे ट्विट करून उर्फी मोठी तत्त्वज्ञानी झाली की काय?, एवढी सुधारली कधी? अशा प्रतिक्रिया नेटक-यांनी दिल्या आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर आक्षेप घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तिच्या कपड्यांवर सडेतोड टीका केली. त्यानंतर उर्फी देखील चांगलीच चवताळली. तिनेही रोज एक ट्विट करून चित्रा वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला. हा वाद काही थांबता थांबत नाही.