मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला ती डेट करत असल्याचे दिसून आले आहे.
जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवाला शिखर पहाडिया याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यातला एक व्हीडीओ व्हायरल होत आहे.
जान्हवी आणि शिखरने एकत्रच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्याआधी अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही हे दोघे एकत्र दिसले होते. शिवाय बोनी कपूर यांच्यासोबतही शिखरचा फोटो व्हायरल होत आहे.