मुंबई : दीपिका पदुकोण अलीकडेच भूतानमध्ये होती. आता ती भूतानहून मुंबईत परतली आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली, ज्याचा एक व्हीडीओ समोर आला आहे. व्हीडीओमध्ये, दीपिका उंच नेक टॉप आणि लाल पफर जॅकेटमध्ये दिसत आहे.
यात तिने डेनिम जीन्स आणि ब्लॅक गॉगलही घातला आहे. एवढ्या उन्हाळ्यात अभिनेत्रीला या आऊटफिटमध्ये पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत असून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
दीपिकाच्या या व्हीडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ती स्वत:ला हॉलिवूड अभिनेत्री समजते’. दुस-या युजरने लिहिले की, ‘सा-या जगाची थंडी हिला वाजते.’ तर तिस-याने लिहिले, ‘अरे बाबा, भारतातील कोणते ठिकाण इतके थंड आहे?’