24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमनोरंजन'यशराज फिल्म्स आणि सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, चौकशी करा'

‘यशराज फिल्म्स आणि सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, चौकशी करा’

एकमत ऑनलाईन

मुंबई | सुशांतने आत्महत्या केल्याने त्याच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंहच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यात त्याने सलमान खान, खान कुटुंब आणि यशराज फिल्म्सवरही गंभीर आरोप केले आहेत.

मी सरकारला विनंती करतो की त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. सुशांतच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीत आपण रोज अनुभवत असलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कदाचित त्यानेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असेल, असं अभिनव कश्यपने म्हटलं आहे.

दरम्यान, यशराज फिल्म टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात भूमिका केलेली असावी. मात्र, हा तपासाचा विषय आहे. हे लोक कुणाचंही करिअर बनवत नाही, तर ते लोकांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात, असंही अभिनव कश्यपने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या