थेट परदेशी गुंतवणूकीसाठी ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ संस्थेची स्थापना

मुंबई : राज्यात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेला ३ हजार कोटींचे भागभांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच नव्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर्सची करतानाच २७ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी उद्योगांना १ लाख ६१ हजार कोटींचे प्रोत्साहन अर्थसा देण्यात येणार आहे.

एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह जागतिक हब बनविण्यासाठी, राज्याच्या विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंटशी सुंसगत नवीन औद्योगिक धोरण आणण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार उद्योग विभागाने पुढील ३५ वर्षांतील( सन २०२५ ते २०६०) राज्याच्या सर्वांगिण प्रगतीचा आढावा घेत नवे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण तयार केले आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान मंत्रिमंडळाने या धोरणास मान्यता दिली असून लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. या धोरणात सन २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणात प्रामुख्याने स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि उच्च मूल्य सेवा क्षेत्राचा विकास, मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती शाश्वत आणि आत्मनिर्भरतेला चालना, सर्वसमावेशक वाढ तसेच नवीन उपक्रमांना चालना देणारे सुलभ व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’चे आयोजन
राज्यात अधिकाधिक प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी नव्याने ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कंपनीस तीन हजार कोटींचे भागभांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून दर दोन वर्षांनी मॅग्नेटीक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्वतंत्र सेवा आयुक्तालय निर्माणास मंजुरी
तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी स्वतंत्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम आयुक्तालय निर्माण करण्यात आले असून सेवा आधारित उद्योग आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाच्या विकासाचे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सेवा आयुक्तालय निर्माण करण्यास धोरणात मान्यता देण्यात आली आहे. या धोरणाच्या माध्यमातून उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी १ लाख १८ हजार २७५ कोटी रुपयांचे सामुहिक प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यासाठी नव्याने सामुहिक प्रोत्साहन योजना लागू केली जाणार आहे.

उद्योग विभागाचे नामांतर
नव्या धोरणाच्या माध्यमातून उद्योग विभागाचे आता उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग असे नामांतर करण्यात आले आहे. नवीन उद्योग धोरण हे सन २०२५ ते २०३०, सन २०३० ते २०४० आणि सन २०४० ते २०६० अशा तीन टप्यात हे धोरण राबविले जाणार असून पहिल्या पाच वर्षात उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मिळून २६ लाख ९७ हजार कोटींची गुंतवणूक आणि ४९ लाख ९२ हजार रोजगार निर्मिती होईल असा अंदाज बांधण्यात आला असूून त्यासाठी उद्योगांना १ लाख ६१ हजार ८५० कोटींचे प्रोत्साहन लाभ दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे २० पेक्षा अधिक नव्या स्मार्ट ओद्योगिक वसाहती विकसित केल्या जाणार असून पाच हजार एकर जागेवर सार्वजनिक- साजगी भागीदारीतून(पीपीपी) अतिविशाल प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून रायगड जिल्हयातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यावर भर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news