अति उष्णतेमुळे महिलांच्या गर्भधारणा, प्रसूतीवर होतोय गंभीर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर, अति उष्णतेमुळे गर्भधारणा आणि प्रसूती ही एक नवीन संवेदनशील समस्या बनली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विभागाचे कार्यकारी सचिव सायमन स्टिल यांनी सोमवारी सांगितले. फिजी येथे आयोजित ‘प्री-कॉप’ परिषदेत ‘बर्थराईट’ अभियानाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते.

स्टिल यांनी एका सर्वेक्षणाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये भारतातील तज्ज्ञांसह ७३% माता आरोग्य तज्ज्ञांनी गेल्या पाच वर्षांत उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद केले आहे. या सर्वेक्षणात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, युनायटेड किंगडम आणि झिम्बाब्वे येथील १,००० माता आरोग्य तज्ज्ञांचा समावेश होता. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘वेलकम’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे.

परिस्थिती स्पष्ट आणि अत्यंत चिंताजनक आहे; उष्णता वाढत असताना, गर्भधारणा आणि प्रसूती ही जागतिक हवामान संकटातील एक नवीन आणि संभाव्य जीवघेणी समस्या बनली आहे, असे स्टिल यावेळी म्हणाले. महिला, बालके, आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य कर्मचारी यांचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर कृती करण्याचे आवाहन या उपक्रमाद्वारे केले जात आहे.

सर्वेक्षणातील जवळपास सर्वच तज्ज्ञांनी उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम झालेल्या गरोदर महिलांवर उपचार केले आहेत. तसेच ९९% तज्ज्ञांनी उष्णतेचा फटका बसलेल्या नवजात बालकांवर उपचार केले आहेत. पाचपैकी चारहून अधिक (८१%)तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, जर अधिक उपाययोजना केल्या नाहीत, तर उष्णतेमुळे माता, गर्भातील बाळ आणि नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. तापमान १ अंश सेल्सिअसने वाढल्यास वेळेपूर्वी प्रसूती होण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी, तर गरोदरपणातील मधुमेहाचा धोका ७ टक्क्यांनी वाढतो, असे वेलकम संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्टिल यांनी सांगितले की, महिलांच्या बाबतीत, गर्भधारणेदरम्यान अति उष्णतेमुळे अकाली प्रसूती, मृत अर्भकाचा जन्म, जन्माच्या वेळी कमी वजन आणि प्रसूतीशी संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत. हे धोके नवजात बालकांनाही, म्हणजेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात नाजूक टप्प्यावर, ग्रासतात.

तीन प्रमुख उपायांची शिफारस
सर्व देशांनी आपल्या राष्ट्रीय हवामान अनुकूलन आणि उष्णतेच्या नियोजन आराखड्यात गरोदर महिला व बालकांच्या आरोग्याचा विशेष समावेश करावा.
सतर्कतेचे इशारे, आरोग्य कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण आणि रुग्णालयांमध्ये सुरक्षित व थंड वातावरणाची निर्मिती करावी.
उष्णतेमुळे होणा-या आरोग्याच्या हानीची अचूक नोंद ठेवावी.

आर्थिक मदतीची गरज
ब्राझीलमधील ‘कॉप-३०’’ परिषदेत ठरल्यानुसार हवामान अनुकूलन निधी तिपटीने वाढवणे आवश्यक आहे. तसेच विकसनशील देशांसाठी दरवर्षी १.३ ट्रिलियन डॉलर निधीची उभारणी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. जर हा निधी उपलब्ध झाला नाही, तर हवामान बदलामुळे निर्माण होणारी असमानता आणि संकट अधिक गडद होईल, असा इशाराही यूएनच्या प्रमुखांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news