फडणवीसांनी शरद पवारांना फोन करत दिले शपथविधीचे निमंत्रण

मुंबई : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रि­पदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल. दरम्यान, शपथविधीच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचादेखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण
राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनादेखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

राज ठाकरेंनाही निमंत्रण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच मैत्री वाढली होती. लोकसभेवेळी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिले असले तरी राज ठाकरे सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

शपथविधी कार्यक्रमाची जोरदार तयारी
दरम्यान, आज दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच कार्यक्रमात अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती. मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तेदेखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news