21.6 C
Latur
Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा शब्द दिला होता

फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा शब्द दिला होता

जळगाव : मी प्रवेश घेतो असे कधी म्हणालेलो नव्हतो. मला प्रवेश घ्या, असे ते म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन गेलो होतो. ४० वर्षे भाजपाचे काम केले. इतके वर्ष काम केले, पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतके सगळे करून भाजपामध्ये मला प्रवेश द्या, अशी विनंती करणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आहे. केंद्रातील पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे. यातच एकनाथ खडसे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

साधारण २०१९ मधील ही गोष्ट आहे. एक दिवशी देवेंद्र फडणवीसांनी बोलवले. आम्ही दोघेच होतो. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर त्यांना म्हणालो, देवेंद्र खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते करणार, हे देणार वगैरे. पण, काही झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे असे त्यांना सांगितले. यावर, ते म्हणाले की, माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो की, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिली होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला.

अद्यापही खुलासा नाही : खडसे
यापुढे भाजपामध्ये जाण्यावर जवळपास फुली मारली आहे. ज्या वेळेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीतील अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला. दिल्लीत असताना जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश झाला. रक्षा खडसे उपस्थित होत्या. माझ्या गळ्यात भाजपाचा मफलर घातला. या घटनेला ५ ते ६ महिने होऊन भाजपाने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून वाट पाहतोय पण अजून काही घोषणा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR