39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयफडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात?

फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची राजधानी नवी दिल्ली बैठक सुरू आहे. निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने तब्बल १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमदेवाराचा समावेश नव्हता.

महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने जोपर्यंत जागावाटप निश्चित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातील उमेदवार जाहीर न करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. मात्र आता जागावाटपाचे चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागल्याने भाजपने महाराष्ट्रातील उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब करण्यास सुरुवात केली असून आजच्या बैठकीत काही जागांबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. भाजपकडून यंदा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांतून दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

याचाच एक भाग म्हणून कॅबिनेट मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच विद्यमान मंत्री सुधी मुनगंटीवार यांनाही चंद्रपुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच पुण्यातून शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सांगलीतून पुन्हा संजयकाका पाटील, कोल्हापुरात समरजीतंिसह घाटगे आणि छत्रपती संभाजीनगरमधून पालकमंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR