शेतकरी नालायक, त्यांच्यासाठी लढणा-यांना मत देत नाहीत

बुलडाणा : दुष्काळाची भीषण परिस्थिती आणि शेतक-यांचे जीवन संपविण्याच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. जे लोक स्वत:चे जीवन संपवतात, त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला कुठल्याही पुढा-याने जाऊ नये, मरायचेच असेल तर १०-१२ पुढा-यांना मारा आणि मग मरा, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. तसेच शेतकरी नालायक आहे, त्यांच्यासाठी लढणा-यांना तो मते देत नाही, असेही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

शेतकरीच नालायक आहेत, त्याला काय करणार? शेतक-यांसाठी जो नेता प्रामाणिकपणे लढतो, त्याला ते मते देत नाहीत. बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर शेतक-यांसाठी लढतात, पण शेतकरी दुस-यालाच निवडून आणतात. त्यामुळे शेतक-यांनी आता स्वत:च्या तोंडात मारून घ्यायला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यात अल निनो येणार हे गेल्या वर्षीपासून माहिती असूनही शासनाने अन्नधान्य, पाणी आणि चा-याचे काहीही नियोजन केले नाही. अस्मानी संकटाला तोंड कसे द्यायचे याचा कोणताही आराखडा सरकारकडे तयार नाही. जर सरकारने अन्नधान्य आणि चारा पुरवला नाही तर नागरिकांनी मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिका-यांच्या घरासमोर लाईन लावली पाहिजे. राज्यात एका बाजूला पाऊस पडत नाही आणि दुस-या बाजूला पर्यावरण नष्ट केले जात आहे, त्यामुळे लोकांनी आता कायदा हातात घ्यायला शिकले पाहिजे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news