सरकारच्या तिजोरीवर शेतक-यांचा पहिला हक्क : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली सापडला आहे. दुष्काळाचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे कसे उभे राहता येईल यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या तिजोरीवर शेतक-यांचा पहिला हक्क आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत शेतक-यांना मदतीचा हात देण्यासह कष्टक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प राज्य व केंद्र सरकारने सोडला आहे. शेतक-यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

परभणीतील स्टेडिअम मैदानावर बुधवार, दि.७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव अभियानाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेनेद्वारे विशेष उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आयोजक तथा खा. संजय जाधव, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. संतोष बांगर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, आ. सईद खान, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, प्रथम महापौर प्रताप देशमुख, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, ज्येष्ठ नेते भास्कर लंगोटे, राजू कापसे, सखुबाई लटपटे, अतूल सरोदे आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी संकटात असल्याची सरकारला जाणीव आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षण शुल्काचा प्रश्­न, शेतीसह जनावरांसाठी पाणी पुरवठा, चारा प्रश्न दूर करण्यात येईल. सरकार मदतीसाठी आखडता हात घेणार नाही. ही दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. शेतक-यांनो धीर सोडू नका, खचू नका. सरकारद्वारे कर्जवसूली थांबविण्यासह कर्जाचे पुनर्गठण केले जाईल. ८० टक्क्यांऐवजी आता १०० टक्के समाजकारणाचा संकल्प शिवसेनेने सोडला आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील टेलपर्यंतच्या गावांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध व्हावे, ६५ गावांना जायकवाडीच्या पाण्याचा लाभ मिळावा, लोअर दुधना सिंचन प्रकल्पाच्या कालव्यांची कामे पूर्ण करीत लाभक्षेत्रास पुरेपूर पाणी मिळावे, जिल्ह्यांतर्गत अन्य सिंचनाच्या व्यवस्था, पायाभूत सुविधांच्या व्यवस्थांवर हे सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमात गरजू कुटुंबातील मुलांना सायकल, शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तसेच यावेळी रुग्वाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतक-यांसह कष्टकरी कुटुंब व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news