23.1 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रधुळे जिल्ह्यात भीषण अपघात; ५ ठार

धुळे जिल्ह्यात भीषण अपघात; ५ ठार

धुळे : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथील अपघाताची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीचा अपघात झाला असून या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होती. त्यादरम्यान भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दीपक असे या पिकअप वाहनचालकाचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR