25.3 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeमहाराष्ट्रदोन एसटी बसचा भीषण अपघात; चाळीसहून अधिक प्रवासी जखमी

दोन एसटी बसचा भीषण अपघात; चाळीसहून अधिक प्रवासी जखमी

  पुणे : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात होऊन यात चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट दिली असून मदतकार्य सुरू आहे. वरवंडमधील कवटीचा मळा परिसरात ही घटना घडली आहे.
परिसरातील सुमारे पाच रुग्णवाहिका जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी हजर होत्या. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही एसटी एकमेकांना धडकल्यानंतर या एसटी आणि प्रवासी बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. घटनास्थळी दौंडचे आमदार राहुल कुल हे उपस्थित असून जखमींना मदतीसाठी ते संबंधित प्रशासनाला सूचना करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR